नेरी शहर व्यापारी असोसिएशन पारिवारिक स्नेह मिलनचा सोहळा अद्भुतपूर्व संपन्न
अनेक मान्यवरांचा केला सत्कार
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
नेरी शहर व्यापारी असोसिएशनचा वतीने पारिवारिक स्नेहमिलन आणि सत्कार सोहळा दि. 8 ऑक्टोबर 2023 रोज रविवारला गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे पार पडला. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे औचित्य साधुन परिवारातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ,गीत गायन , उखाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात हळदीकुंकू कार्यक्रमाने करण्यात आली .ज्या दिवसाची वाट सख्या मोठ्या आतुरतेने पाहत होत्या तो दिवस उजाडला .
आपले विश्व आगळ्यावेगळ्या विश्वात भेटलो, नवरत्न महासागरी अभिमानाने जगलो, ताठर कणा नजरेत बाणा, मधुर वाणीने विश्व जिंकलो!
छेडिल्या तारा स्नेहाच्या, आले जुळणी सुर मिलनाचे, छेडल्या तारा मनातील गुपितांच्या, बरसुनी वर्षा स्वागत सगळ्यांचे, चिंब भिजली मने स्नेहमिलनात.
अगदी असाच भारावलेला देखावा उमटला होता. स्नेह संमेलनाचे संयोजक व्यापारी असोसिएशन यांनी आखलेला हा स्नेहमिलनाचा आराखडा वाखाण्याजोगा ठरला. व्यापारी असोसिएशनच्या कल्पनेतून विविध कार्यक्रमाच्या रूपरेषा साकारण्यास उत्स्फूर्तपणे पुढे सरसावली ती संयोजक समिती म्हणजे अध्यक्ष मंगेश चांदेकर, उपाध्यक्ष सुरेश पिसे , सचिव राजू पिसे, सहसचिव रवींद्र चुटे, कोषाध्यक्ष विलास पिसे आणि इतर कार्यकारणी सदस्य कार्यकारिणी सदस्य या सर्वांचे खूप कौतुक व अभिनंदन अभिनंदन!
हळदी कुंकू कार्यक्रमाचे संचालन शैला मॅडम आणि दिपा कराडे यांनी केले . कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना नेरी येथील नूतन किराणा यांचे घरून बँड पथकाद्वारे लेझीमद्वारे मिरवणूक काढून त्यांचे स्वागत कार्यक्रम स्थळी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनराज मुंगले (तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष चिमूर )हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रेखा नानाजी पिसे (सरपंच ग्रामपंचायत नेरी), दादारावजी पिसे (अध्यक्ष नेरी गुरुदेव सेवा मंडळ ),राजेश शाहू (न्यू भारत गुड्स गॅरेज संचालक) , सदानंद खत्री ( जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष चंद्रपूर), महेश डेंगानी ,प्रवीण सातपुते (अध्यक्ष चिमूर) , बबन बनसोड आणि नवरगाव , सिदेवाही, शंकरपूर चिमूर येथील प्रतिष्ठित व्यापारी आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सत्कारमूर्ती चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया, सुरेश कामडी(विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष), रवींद्र पंधरे (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार चिमुर), निखिल पिसे (ग्रामपंचायत सदस्य), बबलू मोगरे (सफाई कर्मचारी ग्रामपंचायत) यांचा सत्कार व्यापारी असोसिएशन तर्फे शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.या सर्वांचे स्वागत नेरी येथील प्रतिष्ठित व्यापारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बंटीभाऊ यांना व्यापारी असोसिएशन तर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही आमदार बंटीभाऊ यांनी सर्व व्यापारी असोसिएशनला दिली.
सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मंगेश चांदेकर यांनी केले. या प्रास्ताविक मध्ये मंडळाचे अध्यक्ष यांनी नेरीत व्यापारी मंडळाचे स्वतःचे संकुलन असावे ,आणि आरोग्याचे प्रश्न गावातील आणि या व्यापारी वर्गांना खेड्यापाड्यावरील मार्ग जोडून चांगले करून देण्याची मागणी ,या कार्यक्रमातून मा.श्री आमदार बंटी भाऊ भागडीया यांना करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास हरिभाऊ पिसे कोषाध्यक्ष यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू विश्वनाथ पिसे सचिव यांनी केले ,या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र चुटे सहसचिव, सुरेश ज. पिसे उपाध्यक्ष , गुलाबराव ना. कामडी , विलासराव चांदेकर , बापूराव शि. पिसे, दिलीप ग. फाये, अशोक पिसे, चांदखा पठाण,शैलेश शेनमारे , मिलिंद वाघे, राजू दा. पिसे, धनराज पंधरे ,जगदीश पराते,विनोद ल.कामडी,देवा कांमडी या सर्व कार्यकारणीतील सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमा करिता समस्त नेरी व्यापारी असोसिएशन यांनी दिवसभर आपले व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून सर्व सदस्यगण उपस्थित होते .आणि यासर्वांच्या उपस्थितीमध्ये हा स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला.