ताज्या घडामोडी

नेरी व्यापारी असोसिएशनची निवडणूक संपन्न

“नेरीच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान”

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यातील जास्त लोकसंख्येने मोठे असलेल्या गावांपैकी एक नेरी गाव असून या गावाला जास्तीत जास्त 30 ते 32 खेडेगाव जोडलेले आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. नेरी शहर व्यापारी असोसिएशनचे यांची त्रिमासिक आमसभा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कामडी यांचे अध्यक्षतेखाली व समस्त व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यात नवीन कार्यकारिणीची निवड करणे या विषयाचे अनुषंगाने माजी अध्यक्ष सुरेश कामडी यांनी नव्याना संधी मिळावी या हेतूने स्वच्छेने माघार घेत निवडणूक प्रक्रिया राबवली. या अगोदर अध्यक्ष व इतर पदाधिकारी आणि सदस्य यांची निवड ही सर्वानुमते होत होती परंतु या वर्षी इतिहासात प्रथम अध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अध्यक्षपदाचे उमेदवार सतीश आष्टनकर, विलास चांदेकर, मंगेश चांदेकर हे होते. तीनही उमेदवारांपैकी मंगेश चांदेकर यांना सर्वात जास्त मतदान मिळाल्यामुळे त्यांची नेरी व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सुरेश पिसे उपाध्यक्ष, राजू विश्वनाथ पिसे सचिव, रवी चुटे सहसचिव, विलास पिसे कोषाध्यक्ष आणि इतर सदस्यांमध्ये धनराज पंधरे, देवा कामडी, चांदखा पठाण, मुस्तफा शेख, राजू दादाराव पिसे, रिजवान अजनी, अशोक सिताराम पिसे, जगदीश पराते, विनोद लक्ष्मण कामडी, शैलेश शे नमारे, बाबुराव पिसे, मिलिंद वाघे या सर्वांची निवड करण्यात आली. असे एकूण एकूण वीस सदस्यांची कार्यकारणी तयार करण्यात आली. नवीन कार्यकारिणीला माजी अध्यक्ष सुरेश कामडी यांनी पुढील वाट पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close