ताज्या घडामोडी

ओबीसी समाज घटकांची जातीनिहाय जनगणना कराच,चिमूर वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करण्याचे व एमपीरिकल डाटा न देण्याचे केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र म्हणजे ओबीसी समाजाला अप्रगत आणि अउन्नत ठेवण्याचे कटकारस्थानच.

वंचित बहुजन आघाडी द्वारा केंद्र सरकारचा निषेध.

मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे

ओबीसी समाज घटकांची जातीनिहाय जनगणना न करण्याचे व ओबीसी समाजाचा एमपीरिकल डाटा न देण्याचे केंद्र सरकारने शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना न करण्या संबंधात व एमपीरिकल डाटा न देण्या संबंधात शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करणे म्हणजे ओबीसी समाजाला अप्रगत आणि अउन्नत ठेवण्याचे केंद्र सरकारचे कटकारस्थान आहे.
केंद्र सरकारच्या वरील शपथपत्रातंर्गत कटकारस्थानाला हाणून पाडणे आवश्यक आहे व ओबीसी समाज घटकांची जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे.याचबरोबर ओबीसी समाज घटकांचा एमपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सादर करणे उचित आहे.असे असताना केंद्र सरकार ओबीसी समाज घटकांची जातीनिहाय जनगणना न करण्याचे व त्यांच्या एमपीरिकल डाटा न देण्याचे सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे शपथपत्र सादर म्हणजे ओबीसी समाजाला अप्रगत आणि अउन्नत ठेवण्याचे केंद्र सरकारचे कटकारस्थान दिसून येते आहे.
जातीनिहाय जनगणना न करणे व त्यांचा एमपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न करणे हा केंद्र सरकारचा निर्णय ओबीसी समाज घटकांच्या अहिताचा आहे.ओबीसी समाजाचे अहित हे वंचित बहुजन आघाडीला अमान्य आहे.
म्हणूनच वंचित बहुजन आघाडी द्वारा चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या माध्यमातून आज चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ.अजय गुल्हाणे यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात ओबीसी समाज घटकांची सन २०२१ ला जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आणि सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाज घटकांचा एमपीरिकल डाटा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तद्वतच ओबीसी समाज घटकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असेही सुचीत केले आहे.ओबीसीचे राजकिय व प्रशासकीय आरक्षण धोक्यात आणण्याचे छडयंत्र सहन करणे शक्य नाही.यामुळे वंचित बहुजन आघाडी ओबीसी विरोधी केंद्र सरकारचा तीव्र निषेध करीत आहे.
निवेदन देते वेळी सर्वश्री स्नेहदिप खोब्रागडे,नितेश श्रीरामे,नागदेवते सर,शालिक थुल, परसराम नन्नावरे, लालाजी मेश्राम,मनोज राऊत,भाग्यवान नंदेशवर,प्रवीण गजभिये, विकास घोनमोडे,विकास बारेकर,रविंद्र धारने,विनोद सोरदे,आकाश भगत,संदीप मेश्राम,शुभम खोब्रागडे ,आदि मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close