राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे उखर्डा येथे निर्जंतुकीकरण
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
सध्या देशात कोरोना ने थैमान घातले आहे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लाकडावून करण्यात आले आहे. रोहित पवार विचारमंच चंद्रपूर जिल्हा व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अभिजीत कुडे मित्र परिवारातर्फे कोरोना जनजागृती बद्दलचे फलक सुद्धा लावण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात संचार बंदी करण्यात आली आहे,अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सगळी दुकानं बंद आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरोरा तालुका उपाध्यक्ष अभिजीत कुडे व मित्र परिवारातर्फे उखर्डा येथे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळेस रोशन भोयर, विनोद कोठारे ,निलेश कुडे, रणजीत कुडे, आकाश हिवरकर,विजय कुडे,अक्षय काटकर ,प्रवीण कुडे ,सागर मडावी, ऋषिकेश कुडे, नगाजी पाच भाई उपस्थित होते.
“एक पाऊल आरोग्याच्या दिशेने
माझ्या गाव माझी जबाबदारी”
राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी तर्फे उखर्डा येथे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे.कोरोना सारखा महाभयंकर आजार पूर्ण देशात पसरत असून त्याचसोबत डेंगू ,मलेरिया, टायफाईड, चिकन गुनिया अशा आजाराची पडसाद सर्वत्र दिसून येत आहे. हे गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा अध्यक्ष नितीन दादा भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजीत कुडे यांच्या प्रयत्नाने स्वखर्चातून जंतुनाशक फवारणी उखर्डा येथे करण्यात आली आहे.