स्व. नितिन महाविद्यालयात ऑनलाईन निबंध स्पर्धा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील स्व. नितिन महाविद्यालयात देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणादिन म्हणून कोणतेही एक चरीत्र किंवा आत्मचरीत्राचे वाच करून त्यावर पाचशे शब्द मर्यादेत निबंध लिहून तो आॅनलाईन महाविद्यालयाच्या मेल वर पाठवण्याचे आवाहन ग्रंथपाल कल्याण यादव यांनी केले आहे.
स्व नितिन महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग दर वर्षी विद्यार्थ्यां साठी विविध उपक्रम राबवत असतो. कोरोणा काळात गत वर्षी ही विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या वर्षी चे शैक्षणिक वर्ष २० ऑक्टोबर पासून सुरू होत असून वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधत स्व नितिन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या मार्गदर्शनात निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थ्यांनी कोणते ही एक चरीत्र किंवा आत्मचरित्राचे वाचन करून यावर संक्षिप्त स्वरुपात पाचशे शब्दात आशय लिहून तो आॅनलाईन मेल करावयाचा आहे या तील विजेत्या स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती या महाविद्यालयाचे ग्रंथपाल कल्याण यादव यांनी सांगितले. या साठी kalyanyadavlib@gmail.com या मेल आयडीवर पिडिएफ मेल करण्याचे आवाहन ग्रंथपाल यादव यांनी केले आहे. ए फोर साईज वर मेल २१ ऑक्टोबर पुर्वी करण्याचे ही त्यांनी या वेळी सांगितले.