ताज्या घडामोडी

चिमूर पोलिस स्टेशनचा पदभार नवनियुक्त ठाणेदार मनोज गभने स्विकारतील

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

चंद्रपूर जिल्हातंर्गत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून प्राप्त अधिकृत माहितीनुसार चिमूरचे ठाणेदार आर. एम. शिंदे यांची बदली जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे झाली असून चिमूरचे ठाणेदार म्हणून एम. सि. गभने रुजू होतील. सध्या ते भिसी ठाणेदार पदावर कर्तव्य बजावत आहेत.
दि.२५ ऑगस्टचे बदली (पदस्थापना) आदेशानुसार पोनी. प्रविणकुमार पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथून वाहतूक शाखा, चंद्रपूर येथे बदली करण्यात आली तर गडचांदूरचे ठाणेदार जी व्ही भारती यांची भद्रावतीचे ठाणेदार म्हणून पदस्थापना होणार आहे
भद्रावती चे ठाणेदार सुनिलसिंह पवार आता मानव संसाधन विभाग, चंद्रपूर मध्ये जबाबदारी स्वीकारतील. जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे कार्यरत सत्यजित आमले हे गडचांदूर ठाणेदार पदाची जबाबदारी स्विकारतील.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close