ताज्या घडामोडी

जि.प.प्रा.शाळा हटकरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जि.प.प्रा.शाळा हटकरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी सरस्वती पूजन व माता रमाई यांना अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नसिंह पंढरे उपाध्यक्ष श्री.लक्ष्मण जोरवर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच सौ.मीराताई बाबासाहेब जोरवर श्री.लांडगे सर,श्री.गायकवाड सर,व श्री.बिडवई उपस्थित होते. 🏆कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, कोळीगीत,लावणी, चित्रपट गीत इ.बहारदार गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.🏆यावेळी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.🥇🥇 विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव झाला. यावेळी बक्षीस स्वरूपात 65,330 रू. रोख मिळाले.🥇🥇 यातून शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, शालेय फुलबाग व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शालेय साहित्य खरेदी करण्याचा मानस आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शिरसाठ मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन नृसिंह सदगे यांनी केले. मुख्याध्यापक शेख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चापके सर, बाबासाहेब जोरवर, राम जोरवर, सुनील भुसनर ,अशोक खाटीक, आश्रोबा होरगुळे, दत्ता ढेंबरे, अशोक यशवदे, दत्ता गयाळ ,उमेश घाटूळ, प्रल्हाद करवर,दत्ता पुरी,रमेश साठे, हटकेश्वर मित्र मंडळ, भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. तोडकरी सर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close