ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी पुरस्कारासाठी नामांकन पाठवावे : संजय गजपुरे

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

जि.प.व पं.स.सदस्य असोसिएशन महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष कैलास गोरे पाटील यांच्या नेतृत्वात प्रथमच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे असोशिएशनची स्थापना झालेली आहे. ग्राम पंचायतीबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा ग्रामिण भागाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेण्यात अतिशय महत्वाचा वाटा आहे. मात्र जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या विशेष कामगिरीची व योगदानाची नोंद घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशातच दरवेळी बदलणारे गट व गण आणि आरक्षण यामुळे पुढील निवडणुकीपासुनही हे सदस्य वंचित राहतात.
या सर्व बाबींचा विचार करुन राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर असणा-या सदस्यांचे मनोबल व कार्याचा गुणगौरव व्हावा, यादृष्टीकोनातुन सदर संघटनेतर्फे दरवर्षी कार्यक्षम पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पुरस्कार उपक्रम राबविला जाणार आहे. या पुरस्कार योजनेचे हे पहिलेच वर्ष असल्याने गेल्या साडेचार वर्षातील सदस्यांचे कामगिरीचा यात विचार केल्या जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी सदर पुरस्कारासाठी नामांकन देण्याचे आवाहन जि.प. व पं.स.असोशिएशनचे जिल्हा अध्यक्ष संजय गजपुरे यांनी केले आहे.
सदर पुरस्कारातंर्गत राज्य स्तरीय ५ विशेष कामगिरी पुरस्कार, १० कार्यक्षम जि.प.सदस्य, १० कार्यक्षम पं.स.सदस्य, ३ कार्यक्षम जि.प.अध्यक्ष, ३ जि.प.उपाध्यक्ष, ३ विषय समिती सभापती, ३ पं.स.सभापती, ३ पं.स.उपसभापती व प्रत्येक विभागातुन ५ कार्यक्षम जि.प.सदस्य, ५ कार्यक्षम पं.स.सदस्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी विविध मुद्द्यांच्या आधारावर १०० पैकी गुण दिले जातील. त्यानुसार असोशिएशनकडे प्राप्त प्रस्तावांनुसार गुणांचे आधारे पुरस्कार जाहिर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हापरिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत चे गाढे अभ्यासक व प्रखर वक्ते शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार समितीचे गठन करण्यात आले आहे .
पुरस्कारासाठी नामांकन पाठविणेची मुदत दि. ३० सप्टेंबर २०२१ असुन अधिक माहितीसाठी जि.प.व पं.स. असोशिएशनच्या पदाधिका-यांना संपर्क करण्याची विनंती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गजपुरे यांनी केले आहे. या पुरस्कारांचे वितरण लवकरच होणाऱ्या राज्यस्तरीय सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत केल्या जाणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close