ताज्या घडामोडी

वरोरा शिक्षक पतसंस्थेतील महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे रामचंद्र सालेकर यांचेवर पोलीसात तक्रार

(दमन तंत्राचा वापर करुन आवाज दाबण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न)

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत चार ते पाच वर्षापासून सौ.संगीता वरघने नामक महिला आपल्याला पुढे स्थाई नोकरी मिळणार या आशेने संगणक आपरेटर म्हणून अल्पशा मानधनात चार वर्षापेक्षा जास्त काळ नियमीत कार्यरत होत्या. संपूर्ण पतसंस्था संगणीकृत करण्यात सदर महिला कर्मचाऱ्याने अहोरात्र परिश्रम घेतले. परंतु संचालक मंडळाने सदर उच्च शिक्षित तथा संगणकाचे व सहकारखात्याचे इतंभू ज्ञान व अनुभव असलेल्या एका गरीब दारिद्रेरेषेखालील महिलेला डावलून संस्थेचे हित व भविष्य लक्षात न घेता संचालक मंडळातील एका संचालकाचा जावई असलेल्या अल्पशिक्षित शिपायाला क्लर्क पदावर बढती दिली व नवीन शिपायाची नेमणूक करुन सदर महिलेला कोणतेही कारण नसतांना पुर्वसुचना न देता तडकाफडकी सेवेतून काढून टाकून या गरीब महिलेवर अन्याय केला यावर रामचंद्र सालेकर सह अनेक संस्थेच्या सभासदांनी आॕनलाईन आमसभेत व सह्यांचे निवेदने देवून गरीब व लायक महिलेला सेवेत घेण्यासाठी आवाज उठवला सोशल मिडिया तथा प्रिंट मिडियातून सदर महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात सत्य कथन करुन वाचा फोडली तेव्हा संचालक मंडळाच्या काही संचालकाच्या हितसबंधाला व त्यांच्या फायद्याला ठेच पोहचल्याने त्यांचा जळफळाट होवून रामचंद्र सालेकर यांची पोलीसात तक्रार दाखल केली त्यांच्यावर दमन तंत्राचा वापर करुन आवाज दाबण्याचा केवीलवाना प्रयत्न या संचालक मंडळातील काही हितसबंधित संचालकांनी केला व भारतीय संविधानाने अनुछेद १९ नुसार जे काही समाजात किंवा संस्थेत गैरप्रकार चालतात त्यावर
आवाज उठवण्याचा प्रत्येक नागरीकाला हक्क व अधिकार दिला आहे त्याचे हनन केले आहे. प्रत्येकाच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोणीही पायमल्ली करु शकत नाही. परंतु सदर संचालक मंडळातील काही संचालकांनी दमन तंत्राचा वापर करुन आवाज दाबण्यासाठी पोलीसात तक्रार करुन सदर व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे हनन केले आहे.
पतसंस्थेच्या या भ्रष्ट व भोगळ कारभारावर कोणी आवाज उठविण्याची हिम्मत करु नये व आपलीच निरंकुश सत्ता राहावी यासाठी अन्यायाविरुद्ध व यांच्या भोंगळ कारभारावर आवाज उठविणाऱ्या सामान्य सभासदावर पोलीसात तक्रारी करुन पतसंस्थेच्या सभासदात मनी मसल तंत्राचा वापर करुन दहशत निर्माण करुन आवाज दाबण्याचे तंत्र वापरले जात आहे. असल्या निर्दयी व भष्ट संचालक मंडळाची व पथसंस्थेची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाही व्हावी अशी मागणी रामचंद्र सालेकर सह पतसंस्थेच्या बहुसंख्य सभासदांनी केली असून सदर महिलेला न्याय मिळेपर्यत स्वस्थ बसणार नाही व संविधानाच्या अनुछेद १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून दिलेल्या मानसिक त्रासाबद्धल न्यायालयात हात काळे असणाऱ्या सबंधित संचालक मंडळाच्या संचालकावर मानहानीचा दावा करणार असल्याचे रामचंद्र सालेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close