रेती तस्करांच्या मुसक्या आवळणा-या “रोशनीला “मिळाली पदोन्नती
पदोन्नती मिळणा-यात चंद्रपूर जिल्ह्यातील तीन पटवा-यांचा समावेश
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्या सोबतच शासकीय कामात चांगलाच हातखंडा असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील कोरपना तालुक्यातील वनसडी साज्याच्या महिला तलाठी रोशनी कोल्हे यांना नुकतीच मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.तर गेल्या काही वर्षांपासून राजूरा तलाठी दप्तरचा कार्यभार व्यवस्थितपणे सांभाळणा-या विल्सन नांदेकर यांना देखील मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.या शिवाय अतिदुर्गम भागातील राजूरा उपविभागाचे तलाठी दिनेश पत्नीवर हे देखील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील मंडळ अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.कोल्हे यांना सिंदेवाही तहसिल तर नांदेकर यांना ब्रम्हपुरी तालुका मिळाला आहे.पदोन्नती मिळणारे तीनही तलाठी चांगलेच अनुभवी असून सर्व सामान्य जनतेची कामे आता हातावेगळी होण्यास बरीच मदत मिळणार असल्याचे बोलल्या जाते . कोरपना व राजूरा तालुक्या प्रमाणे या देखील तालुक्यांत त्यांनी आपल्या कामाची अशीच चुणूक दाखवावी अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.