ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा (सुर्ला) येथील विद्यार्थिनी शिवानी मोहुर्ले हिची आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सुर्ला वरोरा येथिल विद्यार्थीनीची आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा संभाजीनगर साठी निवड करण्यात आली आहे.
सनय बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय सेवा महाविद्यालय सुर्ला वरोरा येथिल विद्यार्थिनी कु. शिवानी अरविंद मोहूर्ले हिची आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2022 संभाजीनगर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक तर्फे कब्बडी या स्पर्धेसाठी निवड झाली. या बद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव खरवडे, उपाध्यक्ष अश्विनी बरडे ,सचिव सुनील खरवडे, सहसचिव स्वप्नील मोरे, संस्थेचे सर्व सभासद तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिनकर गुरनुले, प्रा. कोरडे, प्रा. सातपुते मॅडम, प्रा.आगलावे, प्रा. ताडे, तुषार कडू, हर्षद ढवस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या झालेल्या निवडीबद्दल वरोरा तालुक्यातील सर्व जनतेकडून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव केल्या जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close