ताज्या घडामोडी

मा. अहमद अन्सारी यांना इंटरनॅशनल बेस्ट सर्व्हिस अवार्ड २०२१

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

मा. अहमद स. अली अन्सारी हे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व. रयत संवाद सोशल मीडिया प्रिंट मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी. समाजसेवा व पत्रकारिता ही त्यांची जीवनशैली. २०२०-२०२१ या कोरोना महामारीच्या काळातसुद्धा मा. अहमद अन्सारी यांनी जनसेवा सुरूच ठेवली. गरजू व्यक्तींना मदत करण्याचे श्रेष्ठ काम त्यांनी अविरत सुरू ठेवले. गाव, तालुका व जिल्ह्यात त्यांचे योगदान देशाच्या समाजास समर्पित राहिले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘ चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ तर्फे श्री लक्ष्मण लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली मा. अन्सारी यांना ‘इंटरनॅशनल बेस्ट सर्व्हिस अवार्ड २०२१- कोरोना योद्धा महाराष्ट्र राज्य’ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. सत्कार समारंभात केंद्र संचालक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र, प्रदेशाध्यक्ष- ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, सदस्य- डी डी किसान कृषी दूरदर्शन, दक्षता अधिकारी- ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी म.रा., पोलीस- फ्रेंड्स महाराष्ट्र पोलीस परभणी, संपादक- सा. जनतेचा कर्णधार, सौ. सचिव इंदू लटपटे- कार्याध्यक्ष सुग्रीव पैठणे हे उपस्थित होते.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी व पुरस्कार प्राप्तीसाठी ए. पी. न्यूज पोर्टल तर्फे खूप खूप अभिनंदन.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close