स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजांचा ग्रामीण महाराष्ट्राशी संपर्क व समस्यांचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
केवळ जिल्ह्याच्या शहरांत जाऊन महाराष्ट्र समजत नाही…
त्यासाठी गाव खेड्यांपर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचून या जनतेशी संवाद साधावा लागतो तोच संवाद स्वराज्य संकल्प अभियानाच्या माध्यमातुन स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे स्वत: ग्रामीण महाराष्ट्राशी संपर्क साधत आहेत.
गेल्या दोन दिवसापासून ते परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेत राज्यकर्त्यांना चांगलेच सुनावत आहेत.
रस्त्यांची दुर्दशा, शेतीचे प्रश्न, सिंचन प्रकल्प, यासारख्या मुलभूत सुविधा नसल्याची खंत ते यावेळी बोलताना व्यक्त करतात.आज दुसऱ्या दिवशी टाकळगव्हाण पिंगळी सायाळा अमडापूर, लोहगाव, शिरशी झाडगाव ,लिमला, दस्तापुर, बामणी ,गोळेगाव ,देवठाणा, देऊळगाव ,या गावांमध्ये जाऊन त्यांनी स्वराज्य संघटनेच्या शाखांची उद्घाटन करण्यात आली आहेत यावेळी त्यांच्यासोबत
यावेळी स्वराज्य प्रवक्ते करण गायकर, धनंजय जाधव, माधव देवसरकर गंगाधर अण्णा काळकुटे आप्पासाहेब कुडेकर तसेच जिल्हा निमंत्रक नितीन देशमुख तालुका निमंत्रक राहुल पवार, चंद्रकांत पवार, साहेबराव कल्याणकर,बालाजी मोहिते, , गजानन जोगदंड, संजय पवारमाऊली कदम ,मंगेश कदम ,शिवराज जोगदंड विनोद साबळे, यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .










