ताज्या घडामोडी

मुस्लिम मताचा प्रभाव निर्णायक राहणार — सलीम इनामदार

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र राज्यातील विविध पक्षा च्या रणधुमाळीत विधानसभा अंतर्गत मुस्लिम मतांचा प्रभाव निर्णायक राहणार असल्याची प्रतिक्रिया लोकश्रेय मित्र मंडळा चे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मुसलमान फक्त आमदार/खासदार नाही तर सत्ताही बदलू शकतात महाराष्ट्रातील मुसलमान एक जुटीने मतदान केल्यास महाराष्ट्रातील विधानसभेच्या विजयाचा निर्णय
मुसलमान घेऊ शकतात
महाराष्ट्रातील अशी 40 विधानसभा क्षेत्रे आहेत जेथे मुस्लिम मते निर्णय घेऊ शकतात यामधील 6 विधानसभा मुस्लिम बहुल म्हणजे 50% पेक्षा अधिक आहे तर 8 ते 10 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतांचा प्रभाव 35 ते 45% इतका आहे !
या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील 35 विधानसभा अशा आहेत जेथे मुस्लिम मतदान 20 ते 30% पर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील 50 विधानसभा अशा आहेत जेथे मुस्लिम मतदान 50 हजारापेक्षा अधिक आहे आणि हे मतदार एका उमेदवाराला जर प्रभावी ठरले तर विजय पक्का होऊ शकतो !
तर जाणून घ्या महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल विधानसभा
मालेगाव सेंट्रल 77%
मारखुर्द शिवाजीनगर 55%
मुंबादेवी (मुंबई) 52%
भिवंडी वेस्ट 51%
भिवंडी पूर्व 50%
मुब्रा-कालवा (मुबंई) 55%
हे महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल विधानसभा आहेत यातील मुब्रा आणि भिवंडी पश्चिम मध्ये मागील 2019 निवडणुकीत हिंदू समाजाचे आमदार निवडून आहे तर उरलेल्या 4 विधानसभेत मुस्लिम आमदार निवडून आले आहेत विशेष म्हणजे मालेगाव सेंट्रल मधून एम आय पक्षाचे मुफ्ती इस्माईल आमदार आहेत
तर सध्या स्थितीत महाराष्ट्रातील 35 ते 45% मुस्लिम मतदान असलेले विधानसभा क्षेत्रातील टक्के वारी
अमरावती 47%
अकोला 46%
औरंगाबाद सेंट्रल 47%
औरंगाबाद वेस्ट 40%
भायकला (मुंबई) 45%
वर्सोवा (मुंबई)36%
वांद्रे (मुंबई)35%
धारावी (मुंबई) 35%
परभणी 40%
या 9 विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मतांचा प्रभाव निर्णायक आहे !💯%खर आहे
या निवडणुकी च्या क्षेत्रात विधानसभेत मुस्लिमांनी जर मुस्लिम आरक्षण आणि संरक्षण तसेच वकफ़ बोर्ड/मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड/अल्पसंख्यांक निधी यासाठी सत्ताधारी भाजपा विरुद्ध लढा देणारे महाराष्ट्रातून 25/30 आमदार विधानसभेत पाठवल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही शरद पवार यांना मुस्लिम ची मते पाहिजेत पण उमेदवार नको केवड एक मुस्लिम नावाला उभे केलेला उबाठा ने तर मुस्लिम अल्पसंख्याक उमेदवाराच दिलेला नाही काँग्रेस ने तरी मुस्लिम उमेदवार दिलेला आहे अशा परिस्थितीत राज्यातील मुस्लिम बांधवांनी विचार पुरवक मतदान करावे कोणाला करावे हे मी सांगत नाही पण मतदानाचा हक्क बजवावा
जर कोणता उमेदवार अल्पसंख्यांक समाजा च्या प्रश्नाची जाणीव असणारे विधानसभेत प्रश्न उपस्थित करून विचार करणाऱ्या उमेदवाराचा निवडून देण्याची आवश्यकता असल्याचे हे मत सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close