खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे:- पँथर डॉ. राजन माकणीकर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सरकारच्या माध्यमातूनच सर्व सरकारी मालमत्ता व कंपन्यांचे अधिकार खाजगी कंपन्यांना बहाल केले जात असून खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षण लागू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे
डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, सर्व सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्यात येत आहे, यामुळे गरीब व आरक्षणामुळे ज्या प्रवर्गाला सोयी सुविधा उपलब्ध होत होत्या त्या आता मिळणार नाही आहेत, यामुळे मनुष्याचा आर्थिक स्तर खालावला जाणार आहे.
आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केली जात आहे, संशोधन केले जात आहे किंतु आरक्षणासाठी मोर्चे आंदोलने काढली जात आहेत, पण काय फायदा ? असाही सवाल पँथर माकणीकर यांनी उपस्तिथ केला आहे.
देशात सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण देऊन आरक्षणाची सुरुवात केली, त्याची अंमलबजावणी संविधांनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ७०/७४ वर्षा पासून आरक्षण अगदी योग्य पद्धतीने राबवले जातात होते.
मात्र; सत्तेत आलेलं मोदी सरकार मात्र गोर गरिबांच्या जीवा वर उठले आहे, आरक्षण हा अधिकार खाजगिकरनाच्या माध्यमातून हिरावून घेतला जात आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक मोदी सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करत असून खाजगिकरनातही आरक्षण लागू करण्यात यावे असा आग्रह करत आहे.
येत्या काही काळात पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पक्षाचे शिष्टमंडल दिल्ली येथे जाणार असून याबाबतीत योग्य तो तोडगा काढण्यात येईल अन्यथा रिपाई डेमोक्रॅटिक कॅज्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.