ताज्या घडामोडी

शालेय जिल्हास्तरीय हौसी मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

शालेय जिल्हास्तरीय हौसी मोंटेक्स बॉल क्रिकेट परभणी
महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व विर संभाजी सेवाभावी संस्था व हौसी मोटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जिल्हास्तरीय शालेय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५-२६
दि.०३/०१/२०२६ वयोगट -१९ वर्षाखालील (मुले व मुली) स्पर्धा संपन्न
आज कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयामध्ये शालेय जिल्हास्तर हौशी मोंटेक्स बॉल शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धा 19 वर्षे मुले व 19 वर्षे मुली या गटामध्ये झाल्या असून या समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाथरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा मोन्टेस बॉल क्रिकेट चे जिल्हाध्यक्ष व वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.श्री. अजिंक्य भैय्या नखाते पाथरी तालुक्याचे क्रीडा संयोजक तुकाराम शेळके मोंटेक्स बॉल जिल्हा सचिव भरत भैया घांडगे माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रणधीर सोळंके सर जिल्हा परिषद प्रशाला वडीचे मुख्याध्यापक चिंचाने सर रामपुरी शाखेचे दूधमोगरे सर वडी येथील काळे सर रामपूरी खुर्द येथील उत्कृष्ट पंच कपिल रनेर कासापुरी येथील राम शहाणे व तालुक्यातील बहुसंख्य क्रीडा शिक्षक उपस्थित होते
स्पर्धेचा मुलांचा अंतिम निकाल
1) शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी- प्रथम
2)शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी खुर्द -द्वितीय
3) जिल्हा परिषद प्रशाला वडी- तृतीय
मुलींचा अंतिम निकाल
1) जिल्हा परिषद प्रशाला वडी- प्रथम
2) शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी खुर्द -द्वितीय
3)शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी- तृतीय
अशा पद्धतीचा अंतिम निकाल राहिला आहे
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाथरी तालुक्याचे क्रीडा संयोजक तुकाराम शेळके भरत घाडगे कपिल रनेर राम शहाणे राम कोसले ऋषिकेश गवळी गोविंद महात्मे सोहेल शेख धनंजय जाधव रणधीर सोळंके भास्कर दूधमोगरे आदींनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close