ताज्या घडामोडी

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते वंधली येथील महिला बचत गटांना ३ लाखाचे धनादेश वितरण

उमेद अभियानामुळे महिलांचा स्व विकास व ग्राम विकास गतिमान – आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील वंधली येथे आदर्श ग्रामसंघ व ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम घेण्यात आले .


उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत कार्यरत असलेल्या आदर्श ग्राम संघाच्या वतीने ग्रामसंघ फलक, निधी वितरण, ग्राम संघ व महीला सरपंच सत्कार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी मिलिंद भोयर होत्या. तर त्यावेळी मंचावर वंधली ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण भोयर , माजी पंचायत समिती सदस्या पार्वता ढोक, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष मिलिंदभाऊभोयर,बी एम एम अरुण चौधरी, बीएम प्रशांत काकडे, उपसरपंच अनिल ठावरी, ग्रामपंचायत सदस्य सागर भोयर, रुपाली धोटे, परिसरातील सरपंच , ग्रामसंघ व प्रभाग संघ पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आशी ग्रामपंचायतचे सरपंच जयमाला भोयर, पांझुर्णी चे सरपंच निर्मला दडमल, वनोजा येथील सरपंच उताणे,येन्सा उपसरपंच सुरेखा लभाने,बांद्रा (बोरगाव)चे सरपंच जया चिंचोलकर,चरूरखटी चे सरपंच वनशिंगे , सालोरी -चरूरखटी प्रभागातील उपस्थित १० ग्रामसंघांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श ग्राम संघाच्या फलकाचे उद्घाटन देखील करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उमेद अभियाना कडून वंधली येथील ५ बचत गट समूहांना प्रत्येकी ६० हजार प्रमाणे एकूण तीन लाख रुपयांचा निधीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. लोणगाडगा गावातील अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रतिभाताईधानोरकर यांनी मार्गदर्शन करताना उमेद मार्फत गावागावात सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. अभियानाचे खाजगीकरण विरोधात तसेच सी आर पी मानधन व इतर बाबी यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी भूमिका पार पाडली जाईल असा सर्वांना विश्वास दिला. ग्रामसंघ व प्रभागसंघ इमारत यासाठी निधी देणार असल्याचे सुद्धा यावेळी जाहीर केले. वरोरा पंचायत समितीचे माजी उपसभापती संजीवनी ताई भोयर यांनी सुद्धा महिलांनी उमेदचे माध्यमातून ग्राम विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी आर पी सविता चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पा ठाकरे यांनी केले तर आभार आरती मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसंघ पदाधिकारी, सदस्य आणि ग्राम पंचायत यांनी विशेष परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close