प्राथमिक आरोग्य केंद्र मोयाबिनपेठा येथे भेट

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून केली चर्चा.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोयाबिनपेठा येते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आकस्मिक भेट देवून लसीकरण व औषध साठा बाबत चर्चा केली.
तसेच जिल्हा परिषद् अध्यक्ष यांनी भेटीत हजरी पुस्तिका व दौर पुस्तिका ची पाहणी केली असता दोन कर्मचारी गैरहजर होते,एक कर्मचारी तर चार दिवसा पासून नसतांना हजेरी पुस्तिका मधे स्वाक्षरी करून आढळल्याने जि.प.अध्यक्ष अधीकच संतापले व यांबाबत अहवाल पाठवण्याची वैद्यकीय अधिकारीला तंबीच दिले.या भेटीत आरोग्य केंद्रांची पाहणी केली असुन निधीच आवश्यकता असल्यास आपण निधी उपलब्ध करून देवू व औषध साठा उपलब्ध असल्याचं सांगितले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,चंद्रु आकुला,प्रशांत गोडसेलवार,विजय बोमनवार होते.