परमपूज्य साईबाबा राम मंदिर पाथरी येथे खंडोबा तळी भंडार कार्यक्रम उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सोमवार दिनांक 18 डिसेंबर, 2023 रोजी परमपूज्य साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे खंडोबा रायाची एडवोकेट अतुल दिनकरराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त श्री साई स्मारक समिती पाथरी यांचे शुभ हस्ते पूजाअर्चा करून तळी भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूजेचे पौरोहित्य अजय शास्त्री पाथरीकर यांनी केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी, मंदिराधिक्षक सौ छाया कुलकर्णी, वेदांत अतुल चौधरी, बालाजी बेदरे विष्णुपंत शिंदे, सौ सुजाता भास्कर डहाळे, सौ कलाबाई कांबळे, श्रीमती कमलबाई तेलंगे व इतर साई भक्त उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती एडवोकेट अतुल दिनकरराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त श्री साई स्मारक समिती पाथरी यांनी दिली.
परमपूज्य साईबाबांचे जन्मस्थान पाथरी येथे मंदिराच्या बांधकामाच्या वेळी पाया खोदण्याचे वेळेस या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला ते अत्यंत पवित्र असे तळघर सापडले. या तळघरात गणपती, मारुती, महादेवाची पिंड तसेच खंडोबा रायाची मूर्ती सापडली. ही सर्व साईबाबांची कुलदैवते आहेत.
चंपाषष्ठीच्या च्या मुहूर्तावर साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे मागील दोन वर्षापासून खंडोबाराया समवेत म्हाळसा बाणाईची पूजा अर्चना करून तळी भंडाराचा कार्यक्रम साजरा करण्यात येत असतो.