ताज्या घडामोडी

महात्मा फुले जयंती व सुरक्षित मातृत्व दिवस कार्यक्रम वरोरा उपजिल्हा रुग्णालयात संपन्न

उपसंपादक: विशाल इन्दोरकर

क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व सुरक्षीत मात्रुत्व दिवस आणि व्यायामाचे महत्त्व असे ३ कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे उत्साहात साजरे करण्यात आले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ वंदना बरडे अधीसेविका यांनी ज्योतीबा फुले यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. सर्वांच्या जीवनात ज्योतीबा फुले यांच्या सारखें व्यक्ती येवोत आणि सर्वांना शिक्षणाचा ज्ञानप्रकाश मिळो अशी कामना केली. कोणीही शिक्षणाशिवाय वंचित राहता कामा नये असै प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या जिवनात असे जोतिबा येवोत आणि शिक्षणात उंच भरारी घेवुन शीखर गाठोत असे प्रतिपादन केले. व्यायामाचे महत्व सांगितले. आणी जिकरीचा विषय सूरक्षीत मात्रुत्व दिवस याविषयीची माहिती दिली. हा कार्यक्रम जनमानसा पर्यंत पोहचवावा आसे मनोगत व्यक्त केले. त्यासाठी सर्व कार्यालयात गावपातळीवर असे आयोजन करून जनजागृती करण्यात यावी अशी विनंती केली. प्रत्येक स्त्रीला तिचा काय अधीकार आहे हे कळायला पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ प्रफुल्ल खूजे जनरल सर्जन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जोतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव आज समाजात कसा आहे यावर माहिती दिली. सूरक्षीत मात्रुत्वाविषयी माहीती दिली. व व्यायाम कसा जरूरी आहे हे सांगीतले. सुत्र संचालन सौ सोनाली राईसपायले यांनी कैले आभारप्रदर्शन श्री गोविंद कूभारे यांनी केले. भीसे माॅडम यांनी व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रियंका दांडेकर यांनी सूरक्षीत मात्रुत्व दिवस सनद वाचली व शपथ घेण्यात आली. कार्यक्रमासाठी सौ मिना मोगरे ,सूजाता, श्री मडावी यांनी मदत केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close