अभाविप वरोरा शाखेचा छात्रनेता संमेलन उत्साहात संपन्न

अभाविप वरोरा शाखेची 2021- 2022 करिता नुतन कार्यकारीणी गठीत
तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणारी देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी छात्र संघटना आहे. अभाविपची स्थापना ही विद्यार्थ्यांना उचित दिशा व योग्य मार्ग दाखविण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच शिक्षा जीवन के लिये जीवन देश के लिये या भावनेने घेतलेली शिक्षा नक्कीच भारताला परम वैभव प्राप्त करून देईल असे प्रतिपादन शक्ती केराम यांनी केले.
अभाविपच्या स्थापनेचा मुख्य उद्देश राष्ट्रीय पुनर्निर्माण करणे हा आहे. विद्यार्थी परिषदेनुसार छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी विद्यार्थ्यांनमध्ये आवड निर्माण करण्याचे काम हे विद्यार्थी परिषद करते.
अभाविप वरोरा शाखेच्या छत्रनेता संमेलाची सुरुवात ही परिषदेचे गीत घेऊन झाली व त्यानंतर उपस्थित सर्वं मान्यवरांनी भारत मातेच्या व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन केले व आपले स्थान स्वीकारले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य महाविद्यालय वरोरा चे प्राचार्य गजाननजी शेळके सर व प्रमुख वक्ता म्हणून अभाविप गडचिरोली विभाग संघटनमंत्री शक्तिजी केराम व अभाविप चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविणजी गिलबिले हे निवडणूक अधिकारी म्हूणन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे गीत सहनगरमंत्री लोकेश रुयारकर यांनी केले तर सूत्रसंचालन कोष प्रमुख सानिया पठाण यांनी केले व उपस्थित मान्यवरांचा परिचय सोशल मीडिया प्रमुख अंकित मोगरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विध्यार्थीनी प्रमुख तृप्ती गिरसावळे हिने केले. नंतर मान्यवारांचे स्वागत करण्यात आले व या मध्ये कोरोना च्या सर्वं नियमांचे पालन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व या नंतर नविन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये नगरमंत्री म्हणून – छकुली पोटे , सह नगरमंत्री – नाझीया पठाण, लोकेश रुयारकर , विद्यार्थिनी प्रमुख – तृप्ती गिरसावळे, सह विद्यार्थिनी प्रमुख- निधी राखुंडे, महाविद्यालय प्रमुख- सौरभ साखरकर, महा. सहप्रमुख – अक्षता माहुरे,कोषप्रमुख- सानिया
पठाण, सह कोषप्रमुख – यश भट
कला मंच प्रमुख- सायली पोटदुखे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख- समिक्षा इंगळे ,कनिष्ठ महाविद्यालय सहप्रमुख – आश्विनी पावडे, खेल प्रमुख- कौशिक घोरपडे, SFS प्रमुख – ओम हनुमंते, SFS सहप्रमुख – आशिष भट, TSVP प्रमुख – करण चिकटे,
TSVP सह प्रमुख- आकाश बावणे, आंदोलन प्रमुख – पुजा येरगुडे, कार्यालय प्रमुख – अथर्व गवळी,कार्यालय सह प्रमुख – रवि शर्मा, SFD प्रमुख – छकुली गेडाम,कार्यक्रम प्रमुख- आदित्य गारघाटे, कार्यक्रम सहप्रमुख – वनमाला माकोडे,
SFD सहप्रमुख- प्रतिक पाटील, स्वाध्याय मंडळ प्रमुख – प्रतिक दाते , सोशल मिडिया प्रमुख* :- अंकित मोगरे, प्रसिद्धी प्रमुख- वंश जयस्वाल यांची घोषणा करण्यात आली तर कार्यकारिणी म्हणून सदस्य- अक्षय देवकर, संचित रामटेके, शिवानी लेडांगे, वैष्णवी चामाटे, साक्षी ढेंगळे, चैताली गाणफाडे, कोमल निखाडे, अनिकेत सरोदे, प्रफुल्ल येलादे, प्रा. धनंजयजी पारके, गणेश नक्षिणे, शकील शेख, प्रविणजी गिलबिले, शक्तिजी केराम. यांची घोषणा करण्यात आली. व अश्या प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.