ग्रामपंचायत कार्यालय सालोरी-येंन्सा ब्लॉक मजरा (लहान)तर्फे महामानवाला अभिवादन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील सालोरी – येन्सा ब्लॉक मजरा ( लहान) कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गावाचे प्रथम नागरिक सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर, ग्रामपंचायत सचिव एकनाथ चाफले, ग्रामपंचायत सदस्य सर्वस्वी हर्षद निब्रड, राजेंद्र बोढे, प्रतिभा मानकर, अनिता आत्राम, संगणक आपरेटर रागिनी मानकर, ग्रामपंचायत कर्मचारी शरद व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.
यावेळी ग्रामविकास अधिकारी एकनाथ चाफले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनेक अष्टपैलू जीवनावर आपल्या वाणीतून प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप मिठाई वाटून करण्यात आला.