ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर विद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव,अटल टिंकरींग लॅब उदघाटन सोहळ्याचे आयोजन

खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार गुणगौरव, उदघाटन व लोकार्पण सोहळा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात दि २६ ऑगस्ट गुरुवार रोजी इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, अटल टिंकरींग लॅब तसेच प्राथमिक विभागाचे दृकश्राव्य कक्षाचे उदघाटन व प्रसाधन गृह लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर, उदघाटक खासदार डॉ प्रितमताई मुंडे, प्रमुख पाहुणे उत्तमराव कांदे (जिल्हा संघचालक- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बीड पुर्व) तर विशेष उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, पत्रकार, माजी विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा, अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे,अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने,अॅड विश्वास जोशी,तेजस महाजन,जगदीश साखरे,प्राचार्य डॉ महेश देशमुख,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदिप जोशी, वंदना मिटकरी यांनी केले आहे.हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता होणार असून कोविड च्या सर्व नियमांचे पालन करुन संपन्न होणार अाहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close