ताज्या घडामोडी
सारिका धाबेकर यांची सलग पाचव्यांदा ग्राम तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा:वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॅक मजरा ( लहान) येथील सामाजिक कार्यकर्त्या व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर यांची तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गवश्या गोबाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवीन समितीची गठन करण्यात आली. यावेळी ग्रामसभा अध्यक्ष सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, सचिव एकनाथ चापले, सदस्य राजेंद्र बोढे, हर्षल निब्रड, प्रतिभा मानकर, अनिता आत्राम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामसभेत उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कैलास तोडासे, ग्यानीवंत गेडाम, प्रकाश झाडे, शितल ढवस, मंदा महातळे, धनराज वांढरे व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.