त्याग मुर्ती माता रमाई आंबेडकर यांची पाथरी येथे 127 वी जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 07/02/2025 रोजी पाथरी भिम नगर येथे त्याग मुर्ती माता रमाई आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भिम नगर महिला मंडळ यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्तेत्या तथा पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे यांचा सत्कार करण्यात आला आणि मा.रेखाताई मनेरे यांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व रमाई आंबेडकर यांच्या कार्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व इतर सर्व महिला अभिवादन करताना दिसत आहेत*भारतीय बौद्ध महासभा पाथरी तालुका शाखा अध्यक्ष मा.शिद्धोधन भाग्यवंत हिशोब, अध्यक्ष मा.शिवराज कांबळे सर,व मा.प्रज्ञाकर मुळे सर,मा. बौद्धा चारर्य,नारायण पैठणे मा..वामन साळवे,यांची प्रमुख उपस्थिती होती तर महिला पदाधिकारी सौ.आम्रपाली भाग्यवंत, श्रीमती इंदुमती वाकडे, शांताबाई वाकडे.सौ.हौसाबाई वाकडे, श्रीमती बायना बाई वाकडे,सौ.आशाताई दाभाडे, सौ.आम्रपाली वाकडे व इतर सर्व पदाधिकारी,व महिला मंडळ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शिद्धोधन भाग्यवंत,तर प्रास्ताविक मा.प्रज्ञाकर मुळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज कांबळे सर यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.परमेशर धनले यांनी आभार मानले अशा प्रकारे पाथरी भिम नगर येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी