नाशिक येथे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी धनंजय शिंदे यांनी घोषणा केली की आम आदमी पार्टी २०२२ मध्ये नाशिक महानगरपालिकेत रोजी संपूर्ण 122 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत.
यावेळी ते म्हणाले की आम आदमी पक्षामध्ये सर्व युवक, युवती व नागरिकांनी यावे. तसेच ते म्हणाले की ज्याला कुणाला पक्षाची उमेदवारी हवी असेल तो निष्कलंक असावा, भ्रष्ट नसावा, तसेच तो जातियवादी नसावा. तसेच ते म्हणाले की येत्या काळात आपचे कार्यकर्ते जनतेत जाऊन चौक सभा घेऊन नाशिककरांचे मुद्दे समजून घेऊन त्यानुसार आपला जाहीरनामा तयार करणार आहेत. तसेच आम आदमी पक्ष हिंदू-मुस्लीम जातीय व धार्मिक मुद्द्याऐवजी शिक्षण, आरोग्य, वीज-पाणी या मूलभूत प्रश्नांना समोर ठेऊन निवडणूक लढवणार आहे. अरविंद केजरीवालांच्या दिल्ली मॉडेल प्रमाणे नाशिक मॉडेल आप सत्तेत आल्यावर विकसित करेल. असेही ते म्हणाले. यावेळी राजमाता जिजाऊ जन्मदिनी अभिवादन केले महाराष्ट्र राज्याचे सचिव धनंजय शिंदे, जितेंद्र भावे, राज्य प्रवक्ता शहराध्यक्ष गिरीश, उगले पाटील, योगेश कापसे, युवा अध्यक्ष एकनाथ साळवे उपाध्यक्ष, विकास पाटील, उपाध्यक्ष अनिल कौशिक, उपाध्यक्ष संजय कातकाडे, जगमेर सिंग खालसा, सचिव सुमित शर्मा, राजेश तिडके सहसचिव, विनायक येवले संघटन मंत्री
पद्माकर आहिरे कोषाध्यक्ष,
चंद्रशेखर महानुभाव, सहकोषाध्यक्ष मंजुषा जगताप, महिला सचिव अनिता यादव,
अभिजीत गोसावी, दिपक सरोदे मीडिया, महेंद्र मगर, तेजस सोनार, सोशल मीडिया जगबीरसिंग, स्वप्नील घिया, अनिल फोकणे, नितीन भागवत, चेतन आहेर ,शुभम पडवळ, राजपूत काका आदि सदस्य उपस्थित होते .