ताज्या घडामोडी

संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला एकास अटक एक आरोपी फरार

मुख्य संपादक : सुशांत इन्दोरकर

चंद्रपुर शहरातमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असुन अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.यांना पाठबळ कुणाचा? अशातच इंदिरा नगर मधिल अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांनी महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर चक्क तलवारीने
प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना काल रात्री ९.०० वाजताच्या सुमारास इंदिरा नगर येथे घडली. या हल्ल्यामध्ये रोहित तूराणकर आणि यांच्या आईला सुद्धा दुखापत झाली असुन जर वेळीच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली नसती तर आरोपीने जीवच घेतला असता अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आरोपी हल्ला करून फरार झाल्यानंतर काही तासानंतर एका आरोपीला पकडण्यात तर दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या अवैध दारूचे धंदे करणाऱ्या दोघांना विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी होत आहे,या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हाके यांच्या नेत्रुत्वात सुरू असुन दुसऱ्या आरोपीला लवकरच पकडून पी सी आर घेण्यात येईल असे पोलिस सुत्रांकडून कळते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close