ताज्या घडामोडी

नांदगाव येथे एटीएम सुरू करण्याची मागणी

एटीएम सुरू करण्याची मागणी

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर व तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले नांदगाव तेथे एटीएम सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. गावालगत बँक ऑफ इंडिया व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून ग्राहकाना सेवा देतात या प्रणालीमुळे लाखोंची उलाढाल होत आहे. मात्र ग्राहकांची संख्या लाखोच्या घरात असल्यामुळे सुविधा मात्र नगण्य आहे. त्यामुळे अनेक वेळा सुविधा व सेवमुळे बँक प्रशासनासोबत ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे हजारो ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो. एटीएम सेवेची ओरड जुनीच आहे.
बँकेत असणारी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी एटीएम सेवा सुरू करण्यात यावे. परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेले नांदगाव एटीएम सुरू करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close