मानवत येथे राहत बिनव्याजी सोसायटी चा परिचय मेळावा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे दि. 26 मे शुक्रवार रोजी राहत को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या मध्ये विशेष म्हणजे बिनव्याजी कर्ज योजनेतून काही गरजू लोकांना कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राहत बिनव्याजी सोसायटी चे मुख्य व्यवस्थापक सिद्दिक खान, संचालक वाजेद अन्सारी, तसेच मुफ्ती मोहम्मद इसाक सहाब कासमी, मुफ्ती मुजाहेद रहेमानी, मुफ्ती तलाह, मौलाना सुलतान मिल्ली, हाफेज लतिफ, हाफेज अकबर, मौलाना हमीद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना सुलतान यांच्या कुराण पठणाने झाली. प्रस्ताविक नजात पठाण सर यांनी केले या प्रसंगी मुफ्ती मुजाहेद रहेमानी यांनी इस्लाम मध्ये व्याज कसे निषिद्ध आहे हे सांगितले तसेच सिद्दिक खान यांनी सोसायटी ची विव्हरचना मांडली तसेच अध्यक्षिय भाषण शफी फारुकी सर यांनी केले आभार प्रदर्शन हबीब भडके यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम सर यांनी केले.
तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख समीर, सय्यद सरफराज, कलीम खान, मुजम्मील भाई, फय्याज भाई, राजुन भाई, पिग्मी एजंट शेख अफसर, उमर फारुख व मोहसीन यांनी परिश्रम घेतले.
मौलाना मुजाहिद यांच्या दुआ ने कार्यक्रमाची समापन झाले.