इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंटपदी अपूर्वा पाटणकर यांची निवड…सेक्रेटरीपदी सारिका शहा

प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड
सन 2024 – 25 साठी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंटपदी अपूर्वा पाटणकर यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी सारिका शहा यांची निवड करण्यात आली. क्लब ने यावर्षी अकराव्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
व्हॉइस प्रेसिडेंट – छाया पवार ,ट्रेझरर – दिपाली लोहार, आय. एस. ओ.- सारिका वेल्हाळ, जॉईट सेक्रेटरी – सुषमा तिवारी, सी.सी.- विद्या शहा, एडिटर – निमिषा गोर ,आय. पी. पी.- तरुणा मोहिरे यांची निवड करण्यात आली. एक्झिक्युटिव्ह कमिटी मध्ये- पुष्पा चौधरी ,डॉ. शैलजा कुलकर्णी, नंदा आवळकर, आशा सावंत ,सुकेशनी कांबळे, अनिता शुक्ला यांची निवड करण्यात आली. मेंबर शिप डेव्हलपमेंट ऑफिसर्स- श्रुती जोशी ,माहेश्वरी जाधव, अंजना माने , पी. आर. ओ. पदी रतन शिंदे , शिवांजली पाटील यांची निवड करण्यात आली. या वर्षामध्ये महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्लब विशेष प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन व शाळेतील मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येतील. आई व मुलांमधील सुसंवाद जोपासण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांना व्यासपीठ मिळावे म्हणून महिला महोत्सव, आदर्श माता व जिजाऊ पुरस्कार असे विविध उपक्रम क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
इनरव्हील इंटरनॅशनल चे हे एकशे एक वे वर्ष आहे. इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन शोभना पालेकर यांच्या नेतृत्वाखाल.