महामुनी बुद्ध विहार लोकार्पण व माता रमाई जयंती उत्साहात संपन्न

ग्रामीण प्रतिनिती :रामचंद्र कामडी
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची 125 वी जयंती ही दिनांक ७ फेब्रुवारी २०२३रोजी महामुनी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा व माता रमाई जयंती नेरी येथे उत्साहात संपन्न झाली. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्ष रथ राहिल्या हे सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा होता. माता रमाईंनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा आहे. तो सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तसेच त्यांचे कर्तुत्व नव्या पिढीला मार्गदर्शक प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील चळवळीत आणि सत्याग्रहामध्ये सक्रिय सहभाग घेत मोठ्या प्रमाणात महिला या चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणल्या. आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले अशा आदर्श त्यागाची रमाईच्या कर्तुत्वाचा गौरव म्हणून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला,,
नेरी येथील महामुनी बुद्ध विहार कृती समिती शांती वॉर्ड नेरी तथा धम्म उपासकाच्या संयुक्त विदयमाने विहाराचे “लोकार्पण सोहळा व माता रमाई जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उद्घघाटन चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभने, यांचे हस्ते करण्यात आले, ग्रामपंचायत उपसरपंच कामडी, ग्रामपंचायत सदस्या संगीता कामडी, ग्रामपंचायत सदस्या सरिता जनबंधू ,शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, पोलीस नाईक कैलास आलम, भंते धम्म सांरई, भारतीय बौद्ध महासभा राज्यअध्यक्ष दिनेश हनुमंते, समता दुत प्रज्ञा राजूरवाडे, प्रमुख अतिथी म्हणून मंचकावर उपस्थित होते, सकाळी १० वाजता बुद्ध पाली पूजा भंते धम्म सारथी यांचे हस्ते करण्यात आले, दुपारी १२:३० वाजता पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विहार लोकार्पण सोहळा संपन्न झाला, आपण जयंतीचा उद्देश प्रत्यक्ष आपल्या जीवनात आचरणात आणल्यास प्रगती साधता येईल असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्या संगीता कामडी यांनी केले. आजचा जयंती कार्यक्रम सर्व धर्मीय समावेशक असून सर्वांची आवर्जून उपस्थिती होती. इतर धर्मियांना बौद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाची भेट देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महामुनी बुद्ध विहार कृती सेवा समिती अध्यक्ष छबिला टेंभूरणे, विलास राऊत, सुशांत इंदूरकर, वीणा राऊत, माला सहारे, हर्षा ढवले, शालिनी साखरे, सीमा इंदोरकर, नंदिनी राऊत, अमर अंबादे, सुरेंद्र ढवले, अनिकेत ढवले, नितीन राऊत, वीशाखा कऱ्हाडे, विशाल इंदूरकर यांनी अथक परिश्रम घेतले.