शारदा फाउंडेशन चे जि.प.चंद्रपूर च्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
शारदा फाउंडेशन च्या माध्यमातून कोविड काळात शाळा बंद होत्या तेव्हा मुलांच्या शिक्षणात खंड पडल्याने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शारदा फाउंडेशनच्या स्वयंसेकांच्या माध्यमातून गावात शिक्षणदान उपक्रम राबविण्यास सुरवात केली. शारदा फाउंडेशन चे अध्यक्ष निकेश आमने पाटील यांनी शिक्षनदान संकल्पना मांडली आणि वरोरा तालुक्यातील तरुणांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा तालुक्यातील जवळपास तीस गावामध्ये शिक्षणदान उपक्रम राबविण्यात आला होता. त्यात शारदा फाउंडेशन चे उपाध्यक्ष शुभम आमने यांनी आपल्या परसोडा या गावापासून सुरुवात केली आणि हळु हळू तालुक्यातील तीस गावापर्यंत शिक्षनदान उपक्रम पोहचवला. गावातील सुशिक्षित मुला-मुलींना त्यांनी त्यांच्या च गावातील जि. प.शाळेच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम चालू केले सर्व गावातील मुलां-मुलींनी सक्रिय सहभाग घेऊन शिक्षणदान हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला होता. हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्धल डॉ.मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी कौतुक केले होते आणि प्रोत्साहन दिले होते. आज त्यांच्या वतीने वर्षा गौरकर अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर यांच्या हस्ते शारदा फाउंडेशनला आणि उपाध्यक्ष शुभम आमने व सर्व स्वयंसेवक याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.