‘ निसर्ग सखा ‘ गोंडपीपरी तर्फे वृक्षारोपण

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
‘ निसर्ग सखा ‘ संस्था गोंडपिपरी ही मागील कित्येक वर्षापासून प्रेरणादायी उपक्रम राबवित आहे.पीडित गरजूंना आर्थिक मदत असो वा सामाजिक कार्यक्रम असोत निसर्ग सखा ही संस्था नेहमीच सहकार्य करीत असते.अशातच ‘निसर्ग सखा’ संस्थेचे संस्थापक मान.दीपक भाऊ वांढरे यांच्या पुढाकारातून दिनांक 1 जुलै 2021 रोज गुरुवारला स्थानिक शासकीय धान्य गोडाऊन गोंडपिपरी येथे वन महोत्सव अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला.आणि ही वृक्ष संपूर्ण शासकीय कार्यालय परिसरामध्ये लावण्याचा संकल्प केला.आजच्या कोरोना च्या काळात वृक्ष किती महत्वाचे आहे,आणि प्रत्येकाने वृक्ष लावावे असे आव्हान ‘निसर्ग सखा ‘ संस्थेतर्फे करण्यात आले.’निसर्ग सखा’ संस्थेने मागील कित्येक वर्षापासून गोंडपिपरी मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘निसर्ग सखा’ संस्थेचे संस्थापक मान.दीपक भाऊ वांढरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मान.संदीप धोबे सर ठाणेदार गोंडपिपरी,आणि मान.के. डी.मेश्राम तहसीलदार गोंडपिपरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.वृक्ष लागवड कार्यक्रम मान.के. डी.मेश्राम तहसीलदार गोंडपिपरी,मान.संदीप धोबे ठाणेदार गोंडपीपरी,मान.संदीप लंगडे वनपरिक्षेत्राधिकरी कोठारी,मान.मंगेश पवार तालुका कृषी अधिकारी गोंडपीपरी,डॉ.विशाखा शेळके मुख्याधिकारी न. प. गोंडपिपरी,मान.सुशील धोपटे ठाणेदार धाबा,मान.नरेश भोवरे क्षेत्र सहाय्यक बल्लारपूर यांच्या शुभहस्ते पर पडला .