आमदार बंटीभाऊ यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
मा. श्री कीर्तिकुमार उर्फ बंटी भाऊ मितेशजी भांगडिया साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी तालुका चिमुर तर्फे रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण व प्रथम कन्यारत्न झालेल्या लाभार्थ्यांना फिक्स रोखे वाटप उपक्रम घण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन विवेक कापसे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शामजी हटवादे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी केले. माननीय बंटीभाऊ मितेश भांगडिया साहेब आमदार हे चिमूर विधानसभा क्षेत्राच्या विकास कामासाठी तसेच चिमूर विधानसभा क्षेत्राच्या गावातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील गरीब जनतेला कोरोना प्रादुर्भाव काळात भोजन पंगत, अन्न ,किराणा, ऑक्सीजन सिलेंडर, मास्क आणि सँनी टायझर पुरवठा तसेच डॉक्टर आपल्या दारी आरोग्य शिबीर औषध उपचार शैक्षणिक आर्थिक गरिबांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेकरिता कार्य करीत आहेत. आज चिमूर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार मा. श्री बंटी भाऊ भांगडीया यांचे वाढदिवसा निमित्ताने तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सोबत चिमूर येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
चिमूर तालुक्यात जन्म घेतलेल्या प्रथम कन्येला आपली लहान बहीण म्हणून तिच्या भविष्याच्या मदतीकरिता एक भाग म्हणून माननीय आमदार साहेबांनी भांगडिया फाउंडेशन तर्फे ३१ प्रथम कन्येला फिक्स रोखे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून मा. डॉक्टर श्यामजी हटवादे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मा. वसंता वारजूरकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राजू देवतळे जिल्हा सचिव, आशिष देवतळे जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, राजू पाटील बोरकर शिंदेवाही तालुका अध्यक्ष भाजपा, राजू पाटील झाडे चिमूर तालुका अध्यक्ष, मनोज मामिडवर पवार जिल्हा परिषद सदस्य, माया ननावरे महिला आघाडी अध्यक्ष, एकनाथ भाऊ थोटे ओबीसी आघाडी अध्यक्ष तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.