जांभुळघाट परिसरात अवैध धंद्यांना अधिक चालना

कोणाचा असावा आशिर्वाद, जागृत जनतेत चर्चेला उधाण
तालुका प्रतिनिधी:रोहित रामटेके चिमुर
भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले जांभुळघाट गाव अवैध धंद्यासाठी तालुक्यातील प्रसिद्ध गाव असून, याकडे भिसी पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक दिवसापासून गावात सट्टा, देशी दारू, मोह फुलाची दारू मोठ्या प्रमाणात अवैध विक्री चालू आहे. गावातील जनता त्रासलेले असून, गावातील जनतेकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही, अवैध दारू, सट्टा खुल्ले आम मध्ये चालत आहे तर कोणाचा आशिर्वाद असू शकते ? असे जनतेत चर्चेला उधाण पाठीवरच्या चौकात येत आहे. याकडे कधी भिसी पोलीस गांभीर्याने लक्ष घालत नाहीत यामुळे दारू विक्रेते आणखी बळजबरीने अवैध धंदे करीत आहेत. याउलट एखाद्या सुज्ञ नागरिक म्हणून अवैध धंदे करणाऱ्यांना धंदे रोखण्यासाठी बोलले तर त्यांनाच धमकवून ‘माझं कोणी काय करणार आहे, तुला वाटते ते कर ‘ असेही व्याख्यान ऐकण्यास मिळते, तर यांच्या बोलण्यावरून अश्या अवैध धंदे वाल्यांना आशिर्वाद कोण देत आहे ? कोणाकडे बोट दाखवावा ? असेही सामान्य जनतेला वाटत आहे. तर इतका खुल्ला अवैध धंदा ( दारू, सट्टा) करीत असताना पोलीस अधिकारी यांच्या लक्षात येत नसणार काय ? असे घुमवणारे प्रश्न जनतेच्या मनात येत आहेत. की येत असेल तर मग कार्यवाही काय फक्त आचारसंहिता मार्च अखेर च करावी काय ? बाकी दिवसात कित्येक कुटुंब रस्त्यावर येतात याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. भीसी पोलीस गांभीर्याने लक्ष वेधून अश्या सट्टा दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी. जांभुळघाट सकट बोडधा, पिंपळगाव, वगळपेट असे गाव आहेत ज्या गावात खूल्ला दारू चा अवैध धंदा होत आहे. हे तिन्ही गाव भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येतात, भिसी पोलीस बाकी कामात पारदर्शकता दाखवते पण अवैध धंदे बंद करून सामान्य जनतेच्या मनात घर करत का नाही ? असा सवाल गावकरी जनता करताना चर्चेत आहे. आता बघायचे आहे की पोलीस प्रशासन काय पाऊल उचलणार ? जनतेच्या हिताचे की गुंड प्रवृत्तीच्या अवैध धंदे करण्याच्या हिताचे ? याकडे जनता टक लावून बघत आहे. अश्या अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी जनसामान्य जनतेत चर्चा रंगात येत आहे.