तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन सरपंच उपसरपंच संघटनानी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी: रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन त्या तात्काळ जिल्हापरिषद स्तरावरून सुटल्या पाहिजे यासाठी चिमूर तालुका सरपंच उपसरपंच संघटनेने दि 27 जूनला जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर याना निवेदन देण्यात आले
सरपंच उपसरपंच संघटना चिमूर तालुका यांनी तालुक्यातील अनेक समस्याना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले यात तालुक्यात स्वछ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आले परंतु बांधकाम पूर्ण होऊनही अजून पर्यंत लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान रक्कम मिळाली नसून या कामात अनियमितपणा दिसून येत असल्यामुळे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि अनुदान लाभार्थ्यांना तात्काळ द्यावा तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या निवडणुका होऊन बराच कालावधी होऊनही शासनाकडून मिळणारे भत्ते अजूनपर्यंत मिळाले नाही ते भत्ते देण्यात यावे तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक गावातील स्ट्रीट लाईट कापण्यात येऊ नये सन2021- 22 या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात आली आहेत परंतु या कामात अनियमिता दिसून येत असल्यामुळे चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाहित इतर अनेक समस्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर याना निवेदन सादर करण्यात आले
यावेळी निवेदन देताना सरपंच/उपसरपंच संघटनचे पधाधिकारी श्री.भोजराज कामडी अध्यक्ष चिमूर तालुका संघटना, श्री.विकास धारने उपाध्यक्ष चिमूर तालुका संघटना, श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी सह सचिव चिमूर तालुका संघटना, सौ प्रीती दीडमुटे उपसरपंच व सदस्य चिमूर तालुका संघटना सौ. जयमाला बोरकर सरपंच गट ग्रामपंचायत गडपीपरी सौ.रोशनी बरसागडे सरपंच बोळधा सरपंच उसरपंच .विजेंद्र घरात कान्हाळगाव .संजय गेडाम सरपंच येरखेडा व तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.