गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीचे खाते PFMS प्रणालीवर सलग्न करा – आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक ३१ जुलै शनिवार रोजी परभणी जिल्हा वार्षिक नियोजन २०२१-२२ बैठकीसाठी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. नवाब मलिक परभणी येथे आले असता आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील सरपंच मंडळीने 15 वा वित्त आयोग अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतचे खाते पी. एफ. एम. एस. प्रणालीवर संलग्न करण्याची मागणी केली.
गंगाखेड पंचायत समिती अंतर्गत ८४ ग्रामपंचायतचे १५ वा वित्त आयोग अंतर अंतर्गत सिंडीकेट बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते. परंतु सध्या सिंडीकेट बँकेचे विलीनीकरण कॅनरा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झाले आहे. सदरील सिंडीकेट बँकेचे विलीनीकरण झाल्यामुळे पी एफ एम एस प्रणालीवर खाते एम ए पी झालेले नाहीत. पीएफएमएस प्रणालीवर खाते एम ए पी न झाल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील झालेल्या विकास कामांची देयके अदा करण्यास खूप मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. त्यामुळे सदरील ८४ ग्रामपंचायतची खाते पीएफएमएस प्रणालीवर करण्यासाठी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये मॅपिंग करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून ग्रामपंचायतचे डि.एस.सी. रजिस्ट्रेशन करता येईल. त्यामुळे १५ वा वित्त आयोग अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतची खाते पी. एफ.एम.एस. प्रणालीवर सलग्न करून देण्याची मागणी आज आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत सरपंच यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.