बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या शासन निर्णयाच्या विरोधात चरणबद्ध आंदोलन
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन द्वारे महाराष्ट्रत आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी:-बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या विरोधातील शासनाचे धोरण आणि शासन निर्णयाच्या विरोधात “प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाव लोकतंत्र बचाव”या विषयासंदर्भात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ( ट्रेड युनियन) या संघटनेद्वारे व मा.वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ३६ जिल्ह्यात ,३५८तालुक्यात चार टप्प्यांमध्ये हे आंदोलन होत आहे.फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील महा विकास आघाडीचे सरकार हे पुरोगामी विचाराचे बहुजन हिताच्या कल्याणाचा कार्यक्रम सोबत घेऊन चालतील तसेच बहुजनांच्या संविधानिक हक्क अधिकाराचे रक्षण करण्यासाठी नवीन धोरणे आणि कायदे करून त्यांची अंमलबजावणी होईल अशी जनतेची अपेक्षा होती . परंतु तसे न होता बहुजन विरोधी धोरणे आणि कायदे करून मूलभूत हक्काचे हनन हे सरकार करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या एससी, एसटी, एन टी, डीएनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, एसबीसी, प्रवर्गातील सरकारी-निमसरकारी व शासकीय आणि सार्वजनिक सेवेतील कर्मचारी अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याचे धोरण तसेच शिक्षण, नोकरी नाकारणे यांच्या विरोधामध्ये त्याचप्रमाणे शेतकरी, महिला, शेतमजूर, बांधकाम कामगार, छोटे व्यापारी,विद्यार्थी यांच्या संविधानिक अधिकार यांच्या विरुद्ध धोरणाची आणि शासन निर्णयाच्या विरोधात सनदशीर व संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू आहे. सर्व बहुजन विरोधी धोरणामुळे बहुजनांची संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण) आणि मूलभूत हक्क अधिकार संपविले जात आहेत.राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य शाखा यांच्यासह सहयोगी संघटना राजकिय ,सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय चरण बद्ध आंदोलन चार टप्प्यांमध्ये निर्धारित केले आहे . पहिले चरण ७ जूलै सर्व तहसिलदार यांना काळीफीत लावून निवेदन देणे.दुसरे चरण१२जुलै २०२१ला तहसील कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने तालुकास्तरीय धरणे आणि घंटानाद आंदोलन. १९ जुलै तालुकास्तरीय रॅली प्रदर्शन आणि सरकारी कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन.
चौथे चरण २६ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन आक्रोश मोर्चा होणार आहे . तरी मराठा, मुस्लीम, ओबीसी, NT, DNT, VJNT,SBC, आणि SC, ST प्रवर्गातील सर्व बंधू भगीनीना सर्व कर्मचारी संघटनांना मतभेद विसरून हक्क, अधिकार, नौकरी, रोजगार वाचवण्यासाठी सर्व तहसिल कार्यालय परभणी जिल्हा या ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे. असे आव्हान राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ मुख्य शाखेचे परभणी जिल्हाध्यक्ष
विशाल मिरखेलकर व राजकुमार घोडके (राज्य उपाध्यक्ष प्रोटॉन महाराष्ट्र )
संतोष जमादार (प्रोटॉन जिल्हाध्यक्ष परभणी) यांनी केले आहे.