भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या मागणीला मिळाले यश
लवकरच होणार भूमी अभिलेख कार्यालयात इंदिरा नगर वासीयांच्या प्लॉट ची नोंद
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
अनेक वर्षांपासून चिमूर येथील इंदिरा नगर वासीयांची मागणी प्रलंबित असतांना विविध संघटनेचे माध्यमातून पट्टे मिळण्याबाबत ची आंदोलने करून जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देऊनही याकडे पाठ फिरवली जात होती. परंतु याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले नाही.मागील काही वर्षाच्या अगोदर श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष ऍड.पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांना चिमूर तालुक्यातील झोपडपट्टी तसेच शासनाने दिलेल्या प्लॉट ला भोगवटा कर लावून शासन कर वसुली करीत आहे.परंतु त्यांना त्यावर पूर्णपणे मालकी हक्क काबीज करता येत नव्हता शासनाने अतिक्रमण काढू नये व सर्वांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी निवेदन दिले परंतु चिमूर तहसील चे तहसीलदार संजय नागतीळक यांना वारंवार निवेदने व चर्चा केली असता नेहमी या विषयावर चर्चा करायला ते तयार होत नव्हते हेतुपुरस्पर याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु कुठल्याही प्रकारे शासनाच्या नाकर्ते धोरणाला न जुमानता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले व त्यास यशस्वी रित्या पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी यांना आदेश दिले कि लवकरात – लवकर भूमी अभिलेख कार्यालयात इंदिरा नगर वासीय जनतेच्या प्लॉट ची नोंदणी करण्यात यावी असे आदेश दिल्याबद्दल भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा , टेरेन्स कोब्रा , जिल्हा प्रमुख सारंग दाभेकर , तालुका अध्यक्ष आरिफ वारसी , व अन्य संगटनेच्या कार्यकर्त्यांनी
यावेळी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.