रा.काँ. च्या शहर अध्यक्षपदी सोमेश्वर रामटेके यांची नियुक्ती
आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
आलापल्ली ग्राम पंचायतीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते सोमेश्वर रामटेके यांची आलापल्ली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आले असून शुक्रवार 16 जुलै रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सोमेश्वर रामटेके यांना नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
आलापल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम व ग्राम पंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके यांची घट्ट मैत्री असल्याने त्यातच सामाजिक कार्याची धडपड व तळमळ असल्याने आलापल्ली शहराध्यक्षपदी सोमेश्वर रामटेके यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे.
सोमेश्वर रामटेके यांना नियुक्तीपत्र देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, आलापल्ली ग्रा.पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, लक्ष्मण येरावार, मनोज बल्लूवार, संतोष अर्का आदी उपस्थित होते.