मौजा गदगाव येथे आटा चक्की व शेवयी मशीनचे उद्घाटन

समूहातील महिलांनी उद्घोजक बनावे श्री. राजेश बारसागडे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी: हेमंत बोरकर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माध्यमातुन तालुक्यात मोठ्या प्रमाणात समूहाचे काम सुरू आहे. महिलांनी छोटे मोठे उद्योग उभारून उद्योजक बनावे असे आव्हाहन तालुका अभियान व्यवस्थापक श्री. राजेश बारसागडे यांनी केले.

आज दिनांक 23/12/2023 रोज शनिवार ला सकाळी 1.00 वाजता मौजा गदगाव येथील सौ. वणमाला झाडे यांचे घरी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कृतिसंगम कार्यक्रमातून मशीन चे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापक श्री. राजेश बारसागडे, तालुका व्यवस्थापक कू. रजनी खोब्रागडे, प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, पशु व्यवस्थापक श्री. पुंडलीक गेडाम, डीआरपी कू. प्रीती डोंगरे, समुदाय संसाधन व्यक्ती विद्या गौतम शंभरकर व गावातील महिला उपस्थित होत्या.