ग्रामीण उत्सवामुळे सामाजिक एकात्मता वाढते – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात माणूस यंत्रकेंद्री होतो आहे. त्यामुळे जीवनात एकाकीपणा वाढला. सोबतच आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा संवाद केवळ सोशल मिडीया पुरताच शिल्लक राहिला आहे. अशा काळात माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी एकी आणि अखंडता वाढली पाहिजे. त्यासाठी पारंपारिक ग्रामीण उत्सव महत्वाचे आहेत. कारण ग्रामीण उत्सवामुळे सामाजिक एकात्मता वाढते. असे मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.
महारशिवरात्रीच्या निमित्ताने तालुक्यातील ईसाद येथील विश्वेश्वर मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा समारंभाच्या सांगता कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, विश्वनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष रखमाजी भोसले, ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर,पोलीस पाटील अशोकराव भोसले, व गावातील सर्व भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, या उत्सवाला तब्बल ९६ वर्षांची परंपरा आहे. हि अभिमानाची गोष्ट आहे. गाव मोठं असूनही एकीचे दर्शन होते. त्यालाही असे उत्सवच कारणीभूत असतात. महाराष्ट्राला अशा उत्सवाची मोठी परंपरा आहे. मात्र असे उत्सव कोणतेही गालबोट न लागता टिकवून ठेवणं फार अवघड असते. मात्र माझे सहकारी आणि जिल्हा परिषदेचे सदस्य किशनराव भोसले, संस्थानचे अध्यक्ष रखमाजी भोसले यांनी ते काम यशस्वीपणे केले आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच आता किशनराव यांनी बोलताना विश्वनाथ मंदिराच्या समोरून जाणाऱ्या मासोळी नदीवर मोठा बंधारा बांधून देण्याची मागणी केली आहे. चला, किशनराव तुमची मागणी जाग्यावर मंजूर करतो. आणि लवकरच बंधारा बाधून देतो.
याप्रसंगी आ.डॉ.गुट्टे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उध्दव भोसले, दत्तराव भोसले, भगवानराव भोसले, उत्तमराव भोसले, गोविंदराव सातपुते,बालासाहेब भोसले, भोजराव नाना सातपुते, भानुदास भोसले, सुदर्शन भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.