ताज्या घडामोडी

सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचा जिल्हा प्रशासनामार्फत सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सोमवारी (दि. 3) रोजी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्त झाले. स्वेच्छानिवृत्ती नंतर ते प्रथमच परभणी जिल्ह्यात आले असता, परभणी जिल्हा प्रशासनामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्पप संचालक रश्मी खांडेकर यांनी यावेळी सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सेवा कालावधीत केलेल्या उल्लेखनिय कार्याची तसेच त्यांच्या सोबत काम करतांना आलेल्या अनुभवाची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close