नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपला दिली महिलांनी पसंतीची पावती
गृपचे कार्य विशेष उल्लेखनिय.
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
गेल्या नव वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील वरुड गांवच्या अभियंता कु.रितू संजय लोहकरे यांचे संकल्पनेतून तयार झालेला सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप सदैव सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील महिला व तरुणींच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्याचे काम करीत असून या गृपचे नांव आता महाराष्ट्रभर पोहचले आहे.दरम्यान डोंबिवली पूर्वच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या श्रुती सतीश उरणकर, उपराजधानी नागपूरच्या अधिसेविका वंदना विनोद बरडे , औद्योगिक भद्रावती नगरीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष कु.किरण विजय साळवी , नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील सुपरिचित मेकअप आर्टिस्ट सोनाली गोनाडे ,ठाणे जिल्ह्यातील नामवंत कवयित्री कु.मंगल शामराव मिसाळ, भद्रावती नगरीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या रंजनी रणदिवे, सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्रख्यात कवयित्री व शिक्षिका कु .अर्चना सुतार ,कणकवली तालुक्यातील पियाळी ग्राम पंचायतच्या महिला ग्रामसेविका संगिता पाटील आदींनी नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपला पसंतीची पावती दिली आहे.सदरहु गृपचे कार्य हे उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया देखिल त्यांनी आपल्या बोलण्यातून या प्रतिनिधीशी( भ्रमनध्वनीवरून )बोलताना (आज रविवारला) दिली आहे .खरोखरचं नवोदितांसाठी हा गृप प्रेरणादायी ठरावा असाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आजच्या घडीला सहज सुचलंचे एकूण १२व्हाॅटसअप गृप कार्यरत असून या गृपवरील सभासद संख्या अंदाजे पाच हजारांच्या घरात आहे.हे थोडे थोडके नव्हे !सदहु गृपच्या मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे ह्या असून या सहज सुचलं मुख्य गृपच्या संयोजिका चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक तर सहसंयोजिका कोठारीच्या वर्षा कोंगरे ह्या आहेत दरम्यान सहज सुचलं गृपला वेळोवेळी अमरावती जिल्ह्यातील पथ्रोडच्या पुरस्कार प्राप्त सुपरिचित जेष्ठ साहित्यिका विजया भांगे ,मूलच्या प्रख्यात कवयित्री स्मिता बांडगे, हैद्राबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी, बल्हारपूरच्या जया पलसावार चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या वंदना हातगांवकर, महिला कार्यकर्त्या मंथना नन्नावरे, छबू वैरागडे , चंदा वैरागडे , भाग्यश्री हांडे , मुक्ता खांडे , वंदना आगरकाठे, संगिता चिताडे, नागपूरच्या माजी नगर सेविका नयना झाडे , प्रियंका डफ, राजूराच्या अल्का सदावर्ते, सविता भोयर ,नंदिनी लाहोळे ,सहज सुचलं कलाकुंजच्या संयोजिका सरोज हिवरे ,भद्रावतीच्या किर्ती पांडे, वर्ध्याच्या भारती मैदपवार या शिवाय नाशिकच्या चैताली आत्राम, चंद्रपूरच्या सरीना शेख ,नागपूरच्या सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट कु.कल्याणी सरोदे , कु.रश्मि पचारे , अंजू पिंपले ,प्रियंका जगझाप ,पूनम कोसरे , पूनम पाटील , कवयित्री वर्षा शेंडे , ज्योति मेहरकुरे, शारदा मेश्राम, प्रियंका मेश्राम, वंदना निरांजने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आगामी काळात गृपवरील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे, संयोजिका रंज्जू मोडक व सहसंयोजिका वर्षा कोंगरे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.