ताज्या घडामोडी

सहज सुचलंच्या नवनिर्मित 15 व्या व्हाॅटसअप गृपची जबाबदारी अकोल्याच्या सुपरिचित साहित्यिक प्रांजल रायपुरे यांच्या कडे

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

कला, साहित्य , सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणारा व त्यांच्या कलागुणांना सदैव चालना देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंचा 15 वा व्हाॅट्सअप गृप नुकताच प्रारंभ झाला आहे.या गृपच्या मुख्य संयोजिका अकोल्याच्या मुळ रहीवाशी असलेल्या सुपरिचित साहित्यिक प्रांजल प्रशांत रायपुरे ह्या आहे.सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहज सुचलं (महिलांच्या हक्काचे व्यासपीठ) असे नांव धारण करणाऱा सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप नव्याने सुरू करण्यात आला आहे.उपरोक्त गृपच्या संयोजिका प्रांजल रायपुरे ह्या उच्च शिक्षित असून आज पर्यंत त्यांनी बरेच साहित्य लिहून काढले आहेत.विदर्भातील काही वृत्तपत्रात व मासिकात त्यांचे साहित्य प्रकाशित देखील झाले आहे.धार्मिक ,प्रेमळ व शांत स्वभावाच्या असणा-या रायपुरे यांनी दिवस रात्र एक करीत नुकत्याच दोनशे काव्यरचना लिहून काढल्या आहेत.लवकरच त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.त्या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.सामाजिक बांधिलकी जपणा-या याच गृपच्या सहसंयोजिका चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार आहे.आजच्या घडीला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपची (सर्व गृप मिळून )सदस्य संख्या पाच हजारच्या घरात आहे.हे उल्लेखनीय आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य जेष्ठ मार्गदर्शिका उपराजधानी निवासी मायाताई कोसरे , चंद्रपूर प्रख्यात साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावतीच्या व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, चंद्रपूर -गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्याच्या सहज सुचलं गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे व अन्य सदस्यगणांनी प्रांजल रायपुरे यांचे अभिनंदन केले आहे.

येत्या १जानेवारीला सहज सुचलं गृप दहाव्या वर्षात थाटात पदार्पण करीत असल्याचे मायाताई कोसरे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना भ्रमनध्वनीवरुन सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp us
Close