ताज्या घडामोडी

चंद्रपूरचे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय चन्द्रपूरलाच ठेवण्यात यावे

आम आदमी पार्टी चंद्रपुरचे इंचार्ज सुनील भोयर यांची मागणी.

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा सहवास आहे.असे असून चंद्रपुर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे कार्यालय गडचिरोली-2 नावाने गडचिरोली ला सुरु आहे.
१३ सप्टेंबर २०१९ ला राजमंत्रीमंडळाच्या मीटिंग क्रमांक ३४ मध्ये निर्णय झाल्यानंतर व चंद्रपुर जिल्ह्यातील आदिवासी बांधवासाठी आयुक्त किंवा उपाध्यक्ष अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी कार्यालय साठी कर्मचारी भरती साठी जाहिरात काढून, त्यांची परीक्षा घेतल्यानंतर कोविड१९ मुळे परीक्षार्थी उमेदवारांचे निकाल पेंडिंग ठेवण्यात आले.आदिवासी बांधवांची यात कुचंबणा होत असून गडचिरोली ला जाण्यायेण्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
म्हणून मा मुख्यमंत्री व मा आदिवासी मंत्र्याना विनंती आहे की,चंद्रपुर चे अनुसूचित जमातीच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे शाखा ही आदिवासी बांधवांची गैरसोय बघता हे कार्यालय चंद्रपुरलाच असावे अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपुरचे इंचार्ज सुनील रत्नाकर भोयर यांनी केलेली आहे. या वेळेस आदिवासी समाजाचे श्री सूरज कोरडे श्री अजय डूकरे,सहसचिव;श्री राजेश चेडगूलवार सोशल मीडिया प्रमुख;श्री राजू कुडे,शहर सचिव,श्री योगेश आपटे सहसंयोजक,श्री अशोक आनंदे कोषाध्यक्ष, श्री वामनराव नांदूरकर, श्री मधुकर साखरकर, श्री बबन कृष्णपल्लीवर, श्री सुखदेव दारुनडे, श्री जयंत थुल, श्री सिकंदर सांगोरे श्री भुवनेश्वर निमगड़े, श्री अवेज शेख, श्री संदीप तुरकयाल, श्री शाहरुख शेख, सौ देविका देशकर, सौ वर्षा सुनील भोयर, श्रीमती वैशाली डोंगरे,श्री दिलीप तेलंग श्री अविनाश दसोड़े इत्यादिचिं उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close