ताज्या घडामोडी

सालोरी येथे युवकाची दगडाने ठेचून हत्या

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

मागील काही दिवसांपासून वरोरा तालुक्यात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे.या सर्व प्रकरणात अवैध धंदे करणाऱ्यांचा सहभाग आहे .त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वाढत्या गुन्ह्यांवर ताबा नाही असे दिसून येते. शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सालोरी या गावात काल दिनांक 15 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अमोल रामदास दडमल वय – 32 वर्ष या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली . पोलिसांना 24 तास लोटूनही अध्यपही आरोपीचा सुगावा लागला नाही .मृतक अमोल रामदास दडमल हा रात्री 11 वाजताच्या सुमारास घरुन बाहेर गेला असता सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अमोल च्या घरापासून हाकेच्या अंतरावर अमोल चे मृत शरीर पडून असलेले दिसून आले , अमोल च्या डोक्यावर दगडाने मारलेल्या खुणा प्राथमिक रित्या दिसून आल्या अमोल हा आपल्या आई सोबत मामा च्या गावी सालोरी येथे जवळपास 10 वर्षा पासून राहत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले .
मृतक अमोल याची मूळ वस्ती मानोरा दादापुर (शेगाव) येथील असून कामाच्या शोधत सालोरी येथे मामा रामदास शेरकुरे यांच्या कडे राहावयास आला . अमोल यास दारू चे व्यसन असून जिल्ह्यातील दारू बंदिच्या काळात अमोल हा दारू विक्रीचा व्यवसायही करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले . अमोल याची हत्या नेमके कोणत्या कारणा मुळे झाली हे अध्यापही समजू शकले नाही अमोल ला मारणार मारेकरी कोण आहे , अमोल चे कोना सोबत जुना वाद तर नसावा , दारू विक्रीच्या धंद्यातून अमोल ची हत्या तर झाली नसावी ना असा कयास बांधल्या जात आहे .अमोल याचा मृतदेह शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणण्यात आला , अमोल चा मृत्यू नेमका कशा मुळे झाला हे शवविच्छेदना नंतर स्पष्ट होईल असे पोलीस अधिकारी यानी सांगितले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close