माता रमाई जयंती रौप्य महोत्सवास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहवे -प्रा संतोष आढाव
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वंचित बहुजन आघाडी घनसावंगी तालुक्याच्या वतीने दिनांक ८/२/२०२२३ रोजी संध्याकाळी ४ वा.संध्याकाळी संत रामदास महाविद्यालय घनसावंगी जिल्हा जालना येथे माता रमाई जयंती निमित्त माता रमाई जयंती शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्यागाचे प्रतीक माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने माता रमाईना कोटी कोटी प्रणाम माता रमाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९७ रोजी दाभोळजवळील वंणदगावाच्या एका गरीब कुटुंबात झाला. आईचे नाव रुक्मिणीबाई भिकू धोत्रे असे होते माता रमाई वंणदगावात नदीच्या काठी महारपुरा वस्तीमध्ये राहतहोत्या त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा आंजलीताई बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे व भालचंद्र भोजने असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र महासचिव अंरूधती सिरसाठ,महाराष्ट्र उपाध्यक्ष सविताताई मुंढे, प्रबुध्द भारत उपसंपादक जितरत्न पटाईत, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटिल, मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जालना जिल्हाध्यक्षा रमाताई होर्शिळ,जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष अकबर इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव ,जिल्हा महासचिव डॉ किशोर त्रिभुवन,जेष्ठ नेते विष्णू कुमार शेळके,जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, शफिक अत्तार तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, सुधीर शरणागत, देविदास कोळे, रोहण वाघमारे, हनुमंत मोरे, लहु धाईत, भानुदास साळवे, प्रकाश मगरे, प्रकाश बोर्डे,किशोर तुपे, रवि भदर्गे, सुभाष जाधव असणार आहेत तर या कार्यक्रमाचे आयोजन घनसावंगी तालुका अध्यक्ष गजानन शेळके, मिलींद शिंदे, बाळासाहेब सोनवणे, सतीश पटेकर, समाधान तोडके, राजकिरण राजगुरू, बाबासाहेब गालफाडे, सुनील पाईकराव, गौतम पटेकर, विष्णू कोल्हे, संदिप घायतडक, प्रशांत खरात, अतिश वानखेडे, समाधान आव्हाड, शिवराम घायतडक, शंकर भालेकर, संदिप दाभाडे, सखाराम जाधव, वसंत मोरे, राजेश शरणागत यांनी केले असून त्यानंतर राहुल वाहुळे प्रस्तुत स्वरसंविधान आर्केस्टा होणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहवे असे अहवान जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव यांनी केले आहे.