श्री गोविंदेव गिरी महाराज, श्रीराम जन्मभूमि अयोध्याचे कोषाध्यक्ष यांनी साई जन्मभूमी पाथरी येथे श्रीराम नवमी निमित्त घेतले दर्शन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर, श्री साई स्मारक समिती पाथरीच्या विश्वस्त मंडळाच्या विनंतीस मान देऊन परमपूज्य राष्ट्रसंत श्री गोविंददेव गिरी (किशोरजी व्यास) यांचे आज श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर परम पूज्य श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी आगमन झाले. सर्वप्रथम त्यांचे आगमन झाल्यानंतर सौ छाया कुलकर्णी मंदिर प्रमुख, सौ नीलिमा संजय भुसारी, सौ प्रज्ञा अतुल चौधरी, सौ शुभांगी पातुरकर, सौ सुजाता डहाळे या पाच सुवासिनींनी त्यांचे यथोचित औक्षण केले. त्यानंतर यांच्या शुभहस्ते परमपूज्य श्रीसाईबाबांची पाद्य पूजा करण्यात आली पूजेचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न उमेश गुरू जोशी सावरगावकर यांनी केले.त्यांनी विशेष करून बाबा चे घर तसेच भक्त निवास व नवेद्य कोठीला भेट दिली. श्रीसाईबाबा जन्मस्थान श्रीसाई स्मारक समिती पाथरी तर्फे श्री संजयजी भुसारी व सौ नीलिमा संजय भुसारी यांनी हस्त पूजा करून त्यांचे येथोचीत आदरातिथ्य केले. त्यानंतर विश्वस्त मंडळातर्फे त्यांचे यथोचित आदरातिथ्य करण्यात आले. प्रसंगी समितीचे अध्यक्ष श्री सीताराम धानू, कार्यकारी विश्वस्त ॲड श्री अतुल चौधरी, कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभान सांगडे, आर्किटेक्ट श्री सुभाष दळी विश्वस्त, श्री संजय भुसारी विश्वस्त, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ना के कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी अॅड श्री मुकुंद चौधरी, मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी आणि भक्तजन उपस्थित असल्याची माहिती श्री बालाजी बेदरे यांनी दिली.