ताज्या घडामोडी

ग्रामपंचायतच्या मालकी जागेवर केले अज्ञात व्यक्तिने अतिक्रमण

अतिक्रमण धारक CCTV कमेरा मध्ये कैद.

पोलिस स्टेशनला झाली तक्रार.

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

महादवाड़ी ग्रामपंचायतला दान दिलेल्या जागेवर अज्ञात व्यक्तिने अतिक्रमण केले असून अतिक्रमण धारकाच्या विरोधात ग्राम पंचायतच्या वतीने चिमुर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करन्यात आली असून अतिक्रमण धारक CCTV कमेरामधे कैद झाले आहेत.
चिमुर तालुक्यातील महादवाड़ी गाव, राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त भाष्कर पेरे पाटिल यांचे प्रेरनेने व जिल्ह्या परिषद गट नेते डाँ, सतीश वारजुरकर यांचे मार्गदर्शनात महादवाड़ी गावचे युवा सरपंच भोजराज कामडी यांचे नेतृत्वात, विकासाचे दिशेन वाटचाल करीत आहे, युवा सरपंचच्या कार्याने प्रभावित होऊन महादवाड़ी गावातील एका कुटुंबाने गावातील सर्वे क्रमांक 82,83,व 85 क्रमानकाची जमीन मालमत्ता महादवाड़ी ग्राम पंचायतला मुलांच्या शारिरिक विकासासाठी क्रीड़ांगन व बालऊद्यानासाठी दान स्वरुपात दिली व ग्राम पंचायत ने रितसर रेकॉर्ड नोंद करत जिल्ह्या परिषद निधिमधुन क्रीडांगनासाठी 5 लाखाचा निधि प्राप्त करून घेतला,
सदर ग्रामपंचायतच्या अधिकृत जागेवर 14 एप्रिल रोजी याच जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून अवघ्या एक महिन्यापूर्वी गावात लावलेल्या CCTV क्यामेरा मधे अतिक्रमण धारक कैद झाले, सदर जागेवर अतिक्रमण झालेमुळे मुलाना खेळण्यासाठी व बाल उदयानाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अतिक्रमण केलेली जागा खाली करण्या करीता ग्रामपंचायतचे सरपंच भोजराज कामडी यानी या संदर्भात शिष्टमंडल सहित चिमुर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून अतिक्रमण धारकानवर कार्यवाही करण्याची मागणी तकरारिद्वारे केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close